Monday, December 30, 2013

आठवणी

आठवणी कधी नदीप्रमाणे ओथंबुन वाहणारया
तर कधी समुद्राप्रमाणे अथांग पसरलेल्या
आठवणी कधी पावसासारख्या रिमझिम बरसणारया
तर कधी तळ्याप्रमाणे शांत

कधी हिरव्या पानाच्या तर कधी पिवळ्या वेलीच्या
कधी कापसासारखी ऊब देणारया तर कधी बाभळीच्या काट्याप्रमाणे रुतणारया
आठवणी कधी विंचुच्या दंशाप्रमाणे झोंबणारया
तर कधी वुक्षाच्या सावलीप्रमाणे शितल

आठवणी कधी बेभान वारयासारख्या सैरावैरा पळणारया
तर कधी आकाशातील ध्रुवाप्रमाणे निश्चल
कधी पाण्यामध्ये निर्माण झालेले तरंग
तर कधी पावसानंतरचा इंद्रधनुष्य

आठवणी कधी अग्नीसारख्या ज्वलंत
तर कधी जणु गोठलेला बर्फ़
कधी पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुवास
तर कधी क्षितीज जो फक्त एक भास

आठवणी कधी सुरिल्या जशी मैफिलीत गायलेली तान
कधी मात्र अमावस्येच्या रात्री भयाण रान
कधी आठवणी पौर्णिमेचा चंद्र
तर कधी त्यांना काळ्या ढगांनी घेरल

आठवणी कधी झेपावती मनात जश्या उसळलेल्या लाटा
तर कधी शुभ्र चांदण्यांचा लाल नभात साठा
जरी असतो त्यात कधी सुखाचा गारवा तर कधी दुःखाचा ओलावा
तरी देतात त्या आपल्याला भुतकाळ परत एकदा जगायला







कालवा

कसली ही तगमग कसली ही चढाओढ
दुसरयाला वाईट दाखवून स्वतःला वर ओढ
लोकांच्या वागण्यात काढायची सतत खोड
आपल्या कार्यातुन समर्थता दाखवणे नाही हा बोध

काहींच्या तोंडी सतत दुसरयाचे गाऱ्हाणे
एकाची पाठ फिरली की त्याला निंदेत नहाणे
दुसरयाचा मुर्खपणा म्हणुन आपण शहाणे?
स्वतःला हुशार ठरवायचे भलतेच हे बहाणे!

कोणाचे चांगले घडल्यास कौतुकात भिजवा
दुसरयाची प्रगती बघुन मनात मात्र जलवा
क्रोध, मत्सर, इर्षा, लोभ, लबाडीचा कालवा
कधी मीळायचा मनास निर्मळतेचा गारवा

दुसरयाचे कष्ट बनवा स्वतःचे भविष्य
तिसरयाची मेहेनत खपवा आपल्या नावावर अवश्य
समोरचा त्रासला तरी वागु असेच पुनःश्च
मनाच्या सुंदरतेतच नाही का सुंदर हे आयुष्य?










पत्ते

रक्तातच आमच्या पत्त्याचे सेट
आजीकडून मिळाली ती आम्हांस सप्रेम भेट
आत्या काकांपासुन भाच्यांपर्यंत थेट
भेटल्यावर नेहमीच असतो पत्त्यांचा बेत

शाळेची सुट्टी उन्हाळ्याची
कडक उकाड्याचे दिवस
घरात गार हवा कूलरची
बसायचो घरात पत्ते पिसत

कधी मी गेले आजोळच्या गावी
तर भाऊबहिणी रमीचा डाव लावी
आम्ही सर्वे जुगारी भावी
ठरले मी रमीत नेहमीच डावी

बदामचा राजा किलवरची राणी
पत्ते कुटतांना ऐकत बसतो गाणी
पोकर खेळतांना लावतो नाणी
पाजते मी त्यात सर्वांना पाणी

खेळत असु तिनशेचार आम्ही आत्याच्या वाडी
उठत नसे तिथुन काही आमची गाडी
आत्या सारया करतात खेळात लबाडी
सर्वांकडे करते मी त्याची चहाडी

चुलत भाऊ आला घरी अगर
जजमेंन्ट खेळू आम्ही रात्रीचा प्रहर
वरतून उठू भल्या पहाटे लावून गजर
जिंकण्याची धमाल येत नाही त्याच्या बिगर

महाबळांनी शोधली सत्तीलावणी वेगळी
लावू शकतो पाहिजे तेवढे पत्ते एकाच वेळी
अश्या सत्त्या अठ्ठ्यांमधे आनंद मला मिळी
रस असला तुम्हास तर चला खेळू एक खेळी!


Sunday, February 10, 2008

विशाखा



इतक्यात कुसुमाग्रजांचे विशाखा नावाचे पुस्तक वाचले. कुसुमाग्रजांसारखे महान कवि महाराष्ट्राच्या भुमीवर होऊन गेलेत हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.



मराठी भाषेशी जरा संपर्क कमी झाल्यामुळे मला आजकाल आकलन व्हायला जरा वेळ लागतो :)
पण जेवढ्या वेळा कविता वाचत गेले तेवढा जास्त त्यांचा अर्थ उलगडत गेला. पुस्तकातील सर्वच कविता सुंदर आहेत. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी पुस्तक जरुर वाचा.



ह्या लेखाचा शेवट कुसुमाग्रजांच्या कवितेतील एका कडव्यानेच करते-
कोठे ना जिवास मायेची ओढ
नाही वा मुळीही ध्येयाची जोड
सार्थता जिविता नाही
भकास दिशा या दाही
कशास आयुष्य देवा, इतुके
शतकामागून जाती शतके.

Thursday, September 6, 2007